बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021: राजस्थान पुढे कोहलीचं राॅयल आव्हान

मुंबई | आयपीएल हंगामातील 16वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मागील 3 पैकी 3 सामने जिंकून बंगळुरूचं मनोबल उंचावलेलं आहे. तर राजस्थानला अद्याप दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे.

मागील सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलीयर्स यांच्या आक्रमक खेळीमुळे बंगळुरूला रॉयल विजय मिळवला आला होता. हा सामना जिंकून त्यांनी विजयाची हॅट्रिक साजरी केली होती. बंगळुरुचे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकताच आरसीबीमध्ये सामील झालेला हर्षल पटेल धारदार गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तर डॅनियल सॅमसन संघात नुकताच असल्यानं गोलंदाजीला आणखी बळ मिळणार आहे.

तर दुसरीकडे राजस्थानचा संघ जिंकण्यासाठी झुंज देत आहे. राजस्थानला 3 सामन्यात केवळ एकच विजय मिळवता आता आहे. सलामीवीर मनन वोहरा राजस्थानसाठी डोकेदुखी ठरत आहे त्याला 3 ही सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तर कर्णधार संजू सॅनसन केवळ पहिला एकच सामना चांगला खेळू शकला आहे. जॉस बटलर चांगली खेळी करत आहे. तर डेव्हिड मिलर संघात पुन्हा आल्यानं राजस्थानचा संघ आज चांगली कामगिरी करू शकतो.

दरम्यान,आतापर्यंत 22 वेळा हे दोन्ही संघ भिडले आहेत यात 10 वेळा बंगळुरू जिंकली आहे तर 10 वेळा राजस्थान जिंकली आहे तर दोन सामने खेळले गेले नाहीत. पण सध्या बंगळुरू संघाची आगेकूच बघता आजच्या सामन्यात बंगळुरू संघाचं पारडं जड आहे. वानखेडेवर सामना असल्याने हा सामना हाय स्कोरिंग असण्याची शक्यता आहे. तर खेळपट्टी पाहता टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरच पगार मिळणार”

रोहित पवारांनी उभारले 1750 बेड्सचे कोव्हिड सेंटर, तुमचा आमदार-खासदार काय करतोय?

“18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या”

बिनधास्त लस घ्या! लसीकरणानंतर कोरोना होण्याचं प्रमाण केवळ 0.01%

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More