कोल्हापूर | महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये गोंधळाचं वातावरण आपण अनेकदा पाहिलं असेल. पण कोल्हापूर महापालिकेतील एका प्रसंगाने साऱ्यांना आश्चर्यचकित केले. कारण एका नगरसेवकाने चक्क दुसऱ्या नगरसेवकाचं चुंबन घेतलं आहे.
महापालिकेच्या विरोधी पक्षाचे म्हणजेच ताराराणी आघाडीचे सदस्य कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले होते. त्यांच्या जवळच काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख बसले. त्यांच्यात कुठल्या तरी विषयावर चर्चा झाली अन् काही कळायच्या आतच भोपळेंनी देशमुखांचं चुंबन घेतलं.
सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव सुरू होते. याचदरम्यान हा प्रकार घडल्याने सभागृहातील सगळ्या नगरसेवकांचं लक्ष भोपळे आणि देशमुख यांनी वेधून घेतलं.
सोशल मीडियावर हा व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, असं काय घडलं की कमलाकर भोपळे यांनी शारंगधर देशमुख यांचं चुंबन घेतलं याबाबत सभागृहात खुपवेळ चर्चा सुरु होती.
ट्रेंडिंग बातम्या-
मशिदींना हात लावल्यास आम्ही मुस्लिमांच्या पाठीशी; आठवलेंचा मनसेला इशारा
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
महत्वाच्या बातम्या-
“भाजप नेते गोळ्या घालण्यास उकसवत असतात, तेव्हा हे होणारच”
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
Comments are closed.