बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्याला मिळाले कोरोना लसीचे तब्बल 60 हजार डोस; आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर लसीकरणाला सुरुवात!

कोल्हापूर | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असतानाच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच लसीअभावी कोल्हापूर मधला लसीकरण गेल्या काही दिवसांपासून बंद झाल्याचं चित्र दिसून आलं.

कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा नसल्याने जिल्हाभरातील लसीकरण गेल्या आठवडाभरापासून बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, प्रशासनातर्फे नागरिकांना कोरोना लसीचा मोठा साठा उपलब्ध करून दिल्याने आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरण पूर्ववत झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळालं.

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज तब्बल 60 हजार कोरोना लसीचे डोस प्राप्त झाल्याने लसीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या लसीकरणादरम्यान ज्येष्ठ नागरिक व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पूर्ण केलेला आहे.

संपूर्ण जिल्हाभरात आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक लसीचा प्रतीक्षेत होते. आज 60 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाल्याने लसीकरणाला वेग येईल, असं बोललं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More