बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीचा विजयरथ अखेर कोलकाताने रोखला! कोलकाताचा दिल्लीवर धमाकेदार विजय

मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात कोलकाता संघाने विजय मिळवला आहे. कोलकाताने प्रथम नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. कोलकाताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत दिल्ली संघाला 127 धावांपर्यंत रोखलं. यामध्ये कर्णधार रिषभ पंत आणि स्टिव्ह स्मिथने प्रत्येकी 39 धावांची खेळी साकारली. त्यानंतर कोलकाता संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात हा सामना आपल्या खिशात घातला आणि दिल्लीचा विजयरथ रोखला.

दिल्ली संघाने दिलेल्या 127 धावांचा कोलकाता नाईट रायडर्स संघाने यशस्वी पाठलाग केला. कोलकाताचा नितेश राणाने धमाकेदार खेळी करत 27 चेंडूत 36 धावा ठोकल्या. तर सुनील नरेनने जोरदार फलंदाजी आणि गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिलं. नरेनने 10 चेंडूत 21 धावांची विजयी खेळी साकारली. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे.

कोलकाताचा सुनील नरेन या फिरकीपटूने धारधार गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. नरेनने 4 षटकात फक्त 20 धावा देत 2 गड्यांना तंबूत धाडलं. तर फर्ग्युसन आणि अय्यर यांनी देखील प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शिखर धवनने 24 धावांची महत्वाची खेळी केली आहे.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या गुणतालिकेत  चौथ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपरकिंग्ज नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात स्टिव्ह स्मिथला संधी देण्यात आली आहे. कोलकाताचा 11 सामन्यात हा पाचवा विजय आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा तिसरा पराभव आहे.

थोडक्यात बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More