बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

मुंबई | राज्यातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. याच पार्श्वभूमीवर कोकणी माणसाला मदतीचा हात द्या, अशी विनंती प्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधव यांनी केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता भरत जाधवनं आवाहन केलं आहे की, आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या. या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती दिलेली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये कशी मदत करायची यासाठी संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत. यावर फोन करुन तुम्ही चौकशी करुन मदतीसाठी हात पुढे करु शकता. सध्या संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना आज वस्तू आणि अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळेच, मराठमोळा अभिनेता आणि कोकणचा पुत्र भरत जाधव पुढे सरसावला आहे.

दरम्यान, कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळं खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महापुरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराचं पाणी जर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप संकट कायम आहे. 

थोडक्यात बातम्या –

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More