पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

“कोथरुडकरांना चंद्रकात पाटलांसारखा उमेदवार मिळणे हे त्यांचं भाग्यच”

Loading...

पुणे | भारतीय जनता पक्षात व महाराष्ट्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे चंद्रकांत पाटील हे उमेदवार म्हणून लाभणं हे कोथरुडकरांचं भाग्य आहे. चंद्रकांत पाटलांमुळे कोथरुडच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील, असं वक्तव्य भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सुतारवाडी भागात चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काकडे यांनी भाजपचे उमेदवार पाटील यांची स्तुती केली. चंद्रकांत पाटलांमुळे कोथरुडकरांचे प्रश्न मार्गी लागतील, असं ते यावेळी म्हणाले.

Loading...

गेल्या 40 वर्षात जी कामं झाली नाहीत ती आता अधिक वेगानं होतील. कोथरुडकरांना विकास हवा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकर प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास काकडेंनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. ब्राह्मण महासंघाने त्यांच्या नावाला तीव्र विरोध केला होता. मात्र, आता त्यांचा विरोध मावळला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या