बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलायका अन् अर्जुनचा फोटो शेअर करत ‘या’ अभिनेत्याने सलमान खानला डिवचलं

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता सलमान खानसोबत अभिनेता केआरकेने पुन्हा एकदा पंगा घेतल्याचं दिसत आहे. याआधी देखील दोघांमध्ये वाद झाला होता ज्यामुळे सलमान खानने केआरकेला कोर्टात खेचलं होतं. मात्र यावेळी केआरकेने सलमानच्या खाजगी आयुष्यावर टीका केली आहे.

केआरकेने सलमानची एक्स वहिनी मलायका अरोरावर निशाणा साधला आहे. अखेर अर्जुन कपूरनं मिळवलंच असं म्हणत तिची खिल्ली उडवली. अर्थात ही कमेंट काही नेटकऱ्यांना आवडली नाही त्यामुळं त्यांनी केआरकेला ट्रोल देखील केलं. अखेर वाढतं ट्रोलिंग थांबवण्यासाठी मग त्यानं आपल्या कमेंटवर स्पष्टीकरण दिलं आहे.

वाढतं ट्रोलिंग थांबवण्यासाठी मग केआरकेनं देखील एक ट्विट केलं करत लोक माझ्या ट्विटचा चूकीचा अर्थ का काढतात?, असा सवाल करत आपण मलायका नव्हे सिद्धार्थ मल्होत्राच्या बाबतीत बोललो असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. अर्जुननं एक ‘विलन 2’ मध्ये सिद्धार्थचा रोल मिळवला त्यासाठी त्याची मी स्तुती करतोय, असं स्पष्टीकरण केआरकेने दिलं.

दरम्यान, केआरकेचं यापुर्वी मलायका अरोरासोबतही भांडण झालं आहे. तिनं देखील त्याच्यावर टीका केली होती. ते निमित्त साधून त्यानं ट्विट केलं होतं की काय? अशी देखील काही नेटकरी शंका उपस्थित करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More