बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! पठाण बंधूंनी गरजू व्यक्तींसाठी दान केलं 10 हजार किलो तांदूळ

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी सर्व स्तरातील लोकं पुढे येत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी सध्याच्या खडतर काळात, आपलं सामाजिक भान राखतं गरजू व्यक्तींच्या अन्नधान्याची सोय केली आहे.

10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत. याआधीही पठाण बंधूंनी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे परिसरातील गरजू व्यक्तींना मोफत मास्कचं वाटप केलं होतं. इरफान आणि युसूफ हे भाऊ आपल्या वडिलांच्या नावाने सामाजिक संस्था चालवतात.

सध्याच्या काळात सरकारला ज्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे ती मदत करायला आम्ही तयार आहोत. पुढचे काही दिवस खडतर असणार आहेत, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांना आम्ही घरातच थांबण्याची विनंती करतो. या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे, असं पठाण बंधूंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘हल्दीराम’च्या मालकाचं निधन; कुटुंब अडकलं परदेशात

फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा- शरद पवार

महत्वाच्या बातम्या-

त्यांना हे बोलायचा अधिकार कुणी दिला??- सुनिल गावसकर

“दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”

ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More