कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

कुलभूषण जाधव

नवी दिल्ली | भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.

हेरगिरीच्या आरोपाखाली रावळपिंडी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावलीय. भारताने या शिक्षेला विरोध करताना तब्बल १६ वेळा कुलभूषण जाधव यांच्याशी काऊन्सिलर अॅक्सेस देण्याची विनंती केली होती. मात्र पाकिस्तानने ती फेटाळून लावल्याने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या