महाराष्ट्र मुंबई

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

मुंबई | ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं.

जानचे वडिल कुमार सानू यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे. गेल्या 40 वर्षात या ‘मुंबादेवी’च्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालो. या भूमीने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. अशा या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशी कुठलीच गोष्ट माझ्या मनातसुद्धा येणार नाही, असं कुमार सानू यांनी म्हटलंय.

माझा मुलगा जान गेली 27 वर्ष माझ्यासोबत राहत नाही. त्याच्या आईने त्याला काय शिकवण दिली, कोणाशी कसे बोलावे हे शिकवले का?, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला नाही, असं कुमार सानू म्हणाले.

दरम्यान, जानचा वडील या नात्याने मी सगळ्यांची माफी मागतो, असं म्हणत कुमार सानू यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

“उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत”

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

“मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या