मुंबई | चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून खळखळून हसायला लावणारा विनोदवीर कुशल बद्रिकेने त्याच्या अनोख्या स्टाईलने कोरोनाविषयक जनजागृती केली आहे. कुशल व त्याच्या कुटुंबियांनी यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. घरात बसून त्यांनी हे तयार केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याने हे गाणं पोस्ट केलं आहे.
‘गो करोनिया… गो गो करोनिया’ असे गीताचे बोल आहे. ओ वुमनिया.. च्या धर्तीवरचे या गाण्याचे बोल आहेत. कुशलचं हे भन्नाट गाणं सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे.
कुशलच्या गाण्याला त्यांच्या फॅन्सनीही चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. त्यांच्या गाण्याला फॅन्सनी लाईक्सचा आणि कमेंट्सा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, सध्याची वेळ घरी बसण्याची आहे. घरीच राहून तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा आणि स्वत:बरोबर घरच्यांचीही काळजी घ्या. घरी काहीतरी creative करा आणि मला नक्की TAG करा, असं त्याने सरतेशेवटी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी
महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश
शेतकऱ्यांच्या मदतीला शरद पवार धावले; केंद्रीय मंत्र्यांकडे केली विनंती
Comments are closed.