बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न दिल्यासंदर्भात 20 लॅबला नोटीस पाठवली होती. परंतु, अद्यापही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर न मिळाल्याने जिल्हा प्रशासन कारवाईच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती आयसीएमआर पोर्टलवर भरणं बंधनकारक आहे. तसेच ही माहिती आयसीएमआर पोर्टलवर अनेक लॅबने भरलेली नाही. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने 20 लॅबला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही अद्याप लॅबकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे यावर उत्तर न देणाऱ्या लॅबचा परवाना रद्द करण्यात येऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच बाहेरील तब्बल 15 हून अधिक चाचणी लॅबचे परवाने जिल्हा प्रशासन रद्द करण्याच्या तयारीत आहे.

जिल्हा प्रशासन कारवाईच्या तयारीत असताना आता तरी लॅबचालक या नोटिशीला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ही माहिती न दिल्यामुळे कोरोना रुग्णांचा अचूक आकडा समोर येत नसल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

थोडक्यात बातम्या

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More