बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

लखनऊ | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या 8 जणात चार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर सगळ्याच स्तरावरून तीव्र प्रतिसाद उमटत आहे. या संपूर्ण घटनेचा निषेध होत असताना एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

लखीमपूर खेरीच्या या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला. या व्हिडीओत शेतकरी मोठ्या प्रमाणात हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आंदोलन करत आहेत. बघता बघता मागून एक जीप आली आणि या भरधाव वेगात येणाऱ्या जीपने आंदोलकांना अक्षरश: चिरडलं. या भरधाव जीपनं अनेकांना जखमी केलं.

या जीपने धडक दिल्यावर एक वृद्ध व्यक्ती बोनेटवर आदळून मग खाली पडल्याचं दिसत आहे. यामुळे आंदोलकांमध्ये देखील भीतीचं वातावरण तयार झालं होतं. जीपच्या पाठोपाठ भरधाव वेगात एक एसयूव्ही देखील आली. काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेस आणि आपच्या अनेक नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर ताशेरे ओढलेत. पोलिस प्रशासनाकडून मात्र या व्हिडीओबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शेतकरी आंदोलकांच्या जमावात गाड्या घुसवल्याने मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यानंतर काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना पोलिसांनी लखीमपूरला जाण्यापासून अडवलं. यावरूनही राजकीय वातावरणात गरमा गरमी दिसली. प्रियंका गांधी आणि पोलिस यांच्यात बराच वेळ शाब्दिक वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यात सध्या समोर आलेल्या या व्हिडीओमुळे मात्र भाजपवर चौफेर टीका होत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या-

”फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं”

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

3 बैठकीतही वाद मिटला नाही मग सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं अन्…; गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

“आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते”

सोशल मीडिया साईट्स तब्बल 6 तास डाऊन, सायबर हल्ला की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More