बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुष्मितासोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर ललित मोदी ‘या’ कारणामुळे माध्यमांवर संतापले, म्हणाले..

मुबंई | काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी एक पोस्ट केली जी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. यावरून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत, अशी माहिती समोर आली. यावरून सुष्मिताचे यापूर्वीचे अफेअर, ललित मोदीची संपत्ती, ललित मोदीने देशाला गंडवलं व फरार झाले, अशा अनेक बातम्या आल्यापासून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, आता ललित मोदींनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

काही तासापूर्वी ललित मोदिंनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तर माध्यमांना मला ट्रोल करण्याबाबत एवढी कोणती आवड आहे? मला वाटतंय की आपण अजूनही अशा जगात वावरत आहोत जिथे दोन लोक मित्र होऊ शकत नाहीत आणि नंतर वेळ चांगली असेल तर जादू घडू शकते. या #क्रॅबमेंटॅलिटीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मात्र इथे सगळेच अर्णव गोस्वामी बनण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा सल्ला असेल की जगा आणि जगू द्या. योग्य बातमी लिहा, असं ललित मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ललितने त्याला ‘फरार’ संबोधल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की मला त्याची पर्वा नाही. तुम्ही मला सांगा कोणत्या न्यायालयाने मला दोषी घोषित केलं आहे? तुम्हाला वाटतं की मला तुम्ही फरारी म्हणण्याची काळजी आहे तर अजिबात नाही. मी “डायमंड स्पून” घेऊन जन्माला आलो आहे, मी लाच घेतली नाही किंवा कधीही गरज पडली नाही. मी जे केलं ते कोणीही करू शकत नाही. 2008 च्या IPLT-20 मध्ये मी एकट्याने सर्व केलं आहे, असं स्पष्टीकरण ललित मोदींनी दिलं आहे.

कदाचित तुम्ही विसरला असाल मी  #raibahadurgujarmalmodi चा नातू आहे. मी पैसे विकत घेतले नाहीत आणि खासकरून जनतेचे तर कधीच नाहीत. कधीही सरकारी मर्जी घेतली नाही. लाज वाटली खोट्या मिडियाची, असा मजकूर त्यांनी लिहला आहे. तर त्यांचा हा मजकूर त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या काही मीडिया चॅनलसाठी होता हे स्पष्ट होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

थोडक्यात बातम्या 

हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

‘हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर’, शिवसेनेची मोदी सरकारवर सडकून टीका

मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More