Lalita Babar - प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर विवाहबंधनात अडकली
- महाराष्ट्र

प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर विवाहबंधनात अडकली

सातारा | प्रसिद्ध धावपटू ललिबा बाबर आयआरएस अधिकारी संदीप भोसले यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. साताऱ्यातील यशोदा टेक्निकल संस्थेच्या मैदानावर हा विवाहसोहळा पार पडला.

विवाहसोहळ्यासाठी सकाळपासूनच लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विवाहविधींना प्रारंभ झाला. यावेळी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोकणचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर विभागाचे सहआयुक्त नितीन वाघमोडे, खानापूरचे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर विवाहबंधनात अडकली

Comments are closed.