बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशभरात कोरोना रूग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 88 दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून सातत्यानं दररोज कोरोना मृताची संख्या घटत असल्याचं चित्र आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे.

रविवारी देशात एक हजार 422 जणांचा मत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यांमध्ये कोरोना मृताची संख्या 45 टक्केंनी घटली आहे. 14 ते 20 जून यादरम्यान नोंद झालेल्या कोरोना मृताची संख्या मागील नऊ आठवड्यातील सर्वात कमी आहे. मागील नऊ आठवड्यात पहिल्यांदाच एका आठवड्यात 14 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले. दररोज देशात दोन हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात 52,256 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर 77,190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत देखील घट होतं दिसत आहे. देशात रविवारी 1422  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या बाधितांची संख्या 88 दिवसांपासून सर्वाधिक कमी आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं जाणवत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला जून महिन्यात 72 लाख लसीचे डोस देण्याचे वितरण आदेश केंद्र सरकारने जारी केले. त्यापैकी 40 लाख डोस आजपर्यंत मिळाले असून 32 लाख डोस 30 जून पर्यंत मिळणार आहेत. महाराष्ट्रात लसीकरणाची गती वाढली आहे, त्यामुळे लसीकरणाच्या फायदा झाल्याचं दिसू लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More