बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जुन्या परंपरेला फाटा देत पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा; लाडक्या बाबांना पोरींचा अखेरचा निरोप

वाशिम | हिंदू परंपरेनुसार घरातील मुलांनी खांदा देण्याची रित आहे. मात्र जुन्या परंपरेला फाटा देत वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांच्या पार्थिवाला पाच मुलींनी खांदा दिला आहे. लक्ष्मणराव इंगळे यांच्या दोन्हीही मुलांचं निधन झाल्यामुळे लेकींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.

लक्ष्मणराव इंगळे यांना दोन मुलं आणि 8 मुली. त्यांनी सर्व मुलींना सुशिक्षित केलं. परिसरातील कोणत्याही सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते कायम अग्रेसर राहत होते. ते भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय करत होते. मात्र लक्ष्मणराव इंगळे यांचं वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.

लक्ष्मणराव इंगळे यांच्या 8 मुलींपैकी 2 मुली आणि दोन्ही मुलांचं अकाली निधन झालं. त्याअगोदर त्यांच्या पत्नी अलोका यांनीही अकाली जगाचा निरोप घेतला होता. मात्र त्यांनी मुलांना आईची कमतरता भासू दिली नाही. लक्ष्मणराव इंगळे यांची दोन्ही मुले हयात नसल्यानं ते कर्तव्य चंदाताई क्षीरसागर, नंदिनी निलखन, नलिनी राऊत, विजया निमनेकर आणि बबिता घाटे या त्यांच्या पाच मुलींनी पार पाडलं.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळेंना 12 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेलं. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला होता.

थोडक्यात बातम्या- 

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More