मुंबई | राजधानी येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर सर्व सेलिब्रिटींसह मोठ मोठ्या हस्तींनी काल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ज्येष्ठ गायिका आणि गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत महान देश आहे आणि आपण सगळे भारतीय यामुळं गौरवान्वित आहोत. एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो अथवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे.
आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीनं तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद, असं म्हणत लता मंगेशकर यांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘इंडिया टूगेदर’ आणि ‘इंडिया अगेनस्ट प्रोपगेंडा’ असे हॅशटॅग वापरले आहेत.
#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda pic.twitter.com/JpUKyoB4vn
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
“आता वर्ष उलटलं, यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसाव लागेल”
दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…
अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात
“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”
“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”