पुणे | कोरोना (corona) गेला या अविर्भावात सगळेजण बिनधास्त राहत असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
मे महिन्यात कोराना रूग्णाची संख्या कमी होती, पण आता कोराना बाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. 225 पेक्षा अधिक रूग्ण या दोन दिवसात जिल्ह्यात आढळून आलेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून रूग्णसंख्येत वाढ होत आहे. बाधितांचा दर 4.6 टक्क्यांवर गेल्याचं सांगितलं जात आहे. जिल्ह्यातील चाचण्या वाढवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. तालुक्याच्या ठिकाणी कोवीड रूग्णालय सुरू करण्यात आलं आहे.
सर्वाधिक रूग्ण 31-40 वयोगटातील असून त्यापैकी 318 जणांचं लसीकरण झालं आहे. गुरूवारपर्यंत 585 केसेस सक्रिय असून बहुतेक नागरिकांचं लसीकरण झाल्याने रूग्णामध्ये गंभीर लक्षणे नसल्याचं सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
महाविकास आघाडीतील आमदारांबाबत देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”
Comments are closed.