बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

मुंबई | मनोरंजन क्षेत्रातील लाफ्टर क्विन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांनी चाहत्यांसोबत गुड न्युज शेअर केली आहे. भारती सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आगळावेगळा व्हिडीओ शेअर करत ती आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

भारती सिंहने तिचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हे होतं आमचं सर्वात मोठं सरप्राईज असं कॅप्शन देत भारतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Bharti Singh Shared Good News)

‘लॉल लाईफ ऑफ लिंबाचियाज’ (LOL Life Of Limbachiyaa) हे भारती आणि हर्षचं नवं यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर हम माँ बनने वाले है या व्हिडीओमध्ये भारती आणि हर्षने आई-बाबा होणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.

भारती आणि हर्षने ‘नच बलिए 8’ मध्ये भाग घेतला होता. तसेच अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील एकत्र काम केलं आहे. भारती आणि हर्षने 3 डिसेंबर 2017 रोजी धुमधडाक्यात लग्नगाठ बांधली होती. आता आई-बाबा म्हणून ते नवी इनिंग सुरू करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ये रिश्ता क्या कहलाता है?; सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा

कोविशील्ड लस घेतली का?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

“माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला…”, गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

“त्यांच्यावर जबाबदारी देऊन पाहिलंय…”, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More