बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूज वेबसाईट्स तसेच यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे | कोविड १९ संक्रमणाच्या काळात राज्यातील अनेक पत्रकारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नोकरी गेल्यानंतरही पत्रकारांनी स्वत:चे बातम्यांचे यू ट्यूब चॅनेल्स तसेच वेब पोर्टल सुरू केले. त्याच बरोबर अनेक खासगी दर्जेदार वेब पोर्टल व वृत्तवाहिन्या राज्यात आधीपासून चांगले काम करत आहेत. त्यांना सरकारी जाहितीचे पाठबळ मिळावे, अशी विनंती भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या बाबतचे निवेदन श्री सुनील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला आज दिले तसेच त्यांना ई मेलद्वारे पाठवले आहे. त्याचप्रमाणे माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांना ही या मागणीचे निवेदन त्यांनी आज प्रत्यक्ष भेटून दिले.

मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोवीड १९ संक्रमणामुळे अनेक क्षेत्राला फटका बसला, पत्रकारिता क्षेत्र ही त्याला अपवाद राहिले नाही. कोरोना मुळे अनेक पत्रकारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. काही ठिकाणी त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. मात्र लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य या पत्रकारांनी सुरूच ठेवले आहे.

नोकरी गेल्यानंतरही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी काही पत्रकारांनी स्वत:चे बातम्यांचे यू ट्यूब चॅनेल्स तसेच वेब पोर्टल सुरू केले आहे. त्याच बरोबर अनेक खासगी दर्जेदार वेब पोर्टल व वृत्त वाहिन्या राज्यात आधीपासून चांगले काम करत आहेत. हा प्रसिद्धी माध्यमांचा नवा मान्यताप्राप्त प्रकार आहे. हा प्रकार सध्या लोकप्रिय होत आहे. मात्र त्यांना उत्पनाचे साधन प्राप्त होत नाही. त्यांना चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, मजकूर तपासून त्याची योग्य प्रकारे छाननी करून, कंटेंट योग्य असणाऱ्या वेब पोर्टल तसेच यू ट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरू करून त्यांना सरकारी जाहिरातीचे पाठबळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे ते यापुढे ही चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेऊ शकतील. अदिती तटकरे यांनी या निवेदनावर सकरात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

थोडक्यात बातम्या-

दहशतवादी झाले मंत्री-संंत्री! तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का?- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, असं नाही, आली आहे- किशोरी पेडणेकर

‘माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागे फेरीवाला नाही यामागे…’; कल्पिता पिंगळेंचा मोठा गौप्यस्फोट

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More