बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गद्दारी करणारे परत निवडून येणार नाहीत”

जळगाव | वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे गेल्यापासून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही (Ajit Pawar) एका कार्यक्रमात बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. जळगाव मधील पाचोऱ्या गावात ते बोलत होतो.

वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्पातून महाराष्ट्रात (In Maharashtra) एक लाख चाळीस हजार कोटींपर्यंत गुंतवणूक होणार होती. यामुळे त्या प्रकल्पाला पूरक असे छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, तसेच कोट्यावंधीच्या महसूल महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. त्यामुळे तरुणांनी याविरोधात तरुणांनी पेठून उठलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना गद्दार म्हणल्यावर त्यांचे दाबे दणाणतात. फुले-शाहुंच्या राज्यात गद्दारी चालत नाही. गद्दारी (treachery) करणारे परत निवडून येणार नाहीत, असा टोलाही पवारांनी शिंदे गटाला लगावला. पाचोऱ्यात कोण निवडूण येणार हे मला पहायचं आहे असंही ते पुढं म्हणाले.

पितृपक्षामुळे 12 मंत्र्यांनी अजून चार्च घेतला नाही. सध्या सरकारच्या सोयीनं सगळं सुरु आहे, त्यामुळे आता थेट सरपंचापासून (Sarpanch) मुख्यमंत्र्याचीही निवड करा, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या

‘स्वत:च्या घरात पाळणा हलत नाही म्हणुन दुसऱ्यांच्या घरात बोटं मोडायची’, शिवसेनेचा हल्लाबोल

“बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून बदनाम करत आहात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More