औरंगाबाद महाराष्ट्र

मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊ असा शब्द कोणत्याही भाजप नेत्याने दिला नव्हता- रावसाहेब दानवे

औरंगाबाद |शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याचा शब्द भाजपच्या कोणत्याही नेत्यानं दिलेला नाही. लोकसभेपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत मी स्वत: होतो, असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दानवेंच्या या विधानामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी मी मातोश्रीवर बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपच्या कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द शिवसेनेला दिला नव्हता. त्यावेळी  देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि जबाबदाऱ्याचे समान वाटप होईल, असं म्हटलं होतं, अशी माहिती दानवे दिली आहे.

मंत्रिपदाच्या समान वाटपामध्ये मुख्यमंत्रिपद नाही. तर पदांच समान वाटप होईल. त्यावेळी त्यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा उल्लेख भाजपच्या कोणत्याही नेत्यानं केला नव्हता, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचे बोललं जात आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या