बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगा पाहू दबंग कोण?; अमोल मिटकरींनी मांडलं आघाडीचं गणित

मुंबई | हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत असताना चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यावेळी आमचे नेते देवेंद्रजी दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिश्यात घेऊन फिरतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होेते. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी मजेशीर ट्विट केलं आहे.

चंद्रकांत पाटील दबंग कोण या प्रश्नाचे उत्तर हे आहे. कोथरूडमध्ये तुम्हाला मिळालेली लीड 25, 495 मिळाली. तुमचे दबंग नेते देवेंद्रजी यांना मिळालेली एकूण लीड 49,482. म्हणजे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मिळून लीड ही 74 हजार 977 होते. आता बारामतीत तुमच्या पक्षाचे डिपॉझिट जप्त करून अजितदादांना मिळालेली 1,65,265 लीड मिळाली. आता सांगा पाहू दबंग कोण?, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे.

आमचे नेते देवेंद्रजी दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिश्यात घेऊन फिरतात. देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी या ट्विटद्वारे चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोपिचंद पडळकर यांच्यावर देखील टीका केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येतंय, हे पहावं लागणार आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More