बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स

नवी दिल्ली | भारतातचं नाही तर जगभरात स्कोडा ऑटो इंडियाने आपली काॅम्पॅक्ट एसयूव्ही स्कोडा कुशक लाँच केली आहे. ही कार लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार असून या कारची किंमत 9 लाख ते 15 लाख यादरम्यान असेल. ही कार कँडी व्हाईट, ब्रिलियंट सिलव्हर, कार्बन स्टील, हनी ऑरेंज आणि टोमॅटो रेड या पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

या कारचे नाव स्कोडा कुशक असून कुशक हा संस्कृत शब्द आहे. यामुळे या कराचं नाव देखील खास आहे, असं म्हटलं जातं. कुशकचा संस्कृत अर्थ एक सम्राट किंवा राजा असा होतो. या कारची लांबी 4,221 मिलीमिटर तर रुंदी 1,760 मिलीमिटर आणि 1,612 मिलीमिटर आहे. या कारचा ग्राऊंड क्लीयरन्स 188 मिलीमिटर एवढा आहे.

स्कोडा कुशक या कारमध्ये 1.0 लीटर, 3 सिलिंडर टिएसआय आणि 1.5 लीटर, 4-सिलिंडर टिएसआय इंजिन देण्यात आले आहे. याचे 10 लिटरचे 3 सिलिंडरचे इंजिन 112 बीएचपी ताकद निर्माण करते. दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबाॅक्स स्टँडर्ड मिळणार आहे. 1.0 लीटर टिएसआय मध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि 1.5 लीटर टिएसआय मध्ये 7 स्पीड डीएसजीचा पर्याय असणार आहे.

या कारमध्ये एक मोठा टचस्क्रीन इंफोटमेन्ट सिस्टिम, एक ऑल डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोलचा प्रयोग करण्यात येणार आहे. याशिवाय यात इन-कार कनेक्टीव्हिटी टेक, पूश- बटन स्टार्ट / स्टाॅप, सनरुफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आदिंचाही समावेश असेल.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरीबाचा एम.एस. धोनी”

कोरोना झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारेे असणार विशेष परीक्षेचं आयोजन, जाणून घ्या!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More