बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुंबई | अभिनेत्री आलिया भट्टचा नुकताच नवीन ट्रीझर सोशल मीडियावर आला आहे. या ट्रीझरने संपुर्ण सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला आहे. शेअर केलेला ट्रीझर हा आलिया भट्टच्या नवीन चित्रपटाचा असून या चित्रपटात आलियाने गंगा हरजीवनदास काठीयावाडी नावाच्या एका माफिया क्वीनची भुमिका साकारली आहे. गंगुबाई ही एक मोठी नावाजलेली मुंबईची पहिली माफिया क्वीन असल्याचं बऱ्याचं लोकांना माहिती आहे. मात्र हीची खरी कहाणी काय आहे याकडे लोकांचा कल लागलेला आहे.

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाई ही मुळची गुजरातची आणि तीचं कुटुंब वकिली व्यवसायाशी जोडली होती. गंगु तीच्या कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती. तीला बाॅलिवूड दुनियेची प्रचंड आवड होती. गंगुला एक अभिनेत्री बनायचं असून या आवडीने तीला मुंबईच्या दिशेने ओढलं. गंगुच्या 16व्या वर्षी तीच्या वडिलांकडे रमणीकलाल नावाचा एक अकाऊंटंट तरूण मुंबईवरुन कामाला आला होता. हा तरुण मुंबईवरुन आल्याने तीला तीचं स्वप्न त्याच्या माध्यमातून पुर्ण होतील असा गैरसमज झाला.

गंगुबाईच्या वडिलांकडे अकाऊंटंट म्हणून कामाला असलेल्या तरुणासोबत गंगुला प्रेम झालं आणि दोघांनी घारातून पळून जाऊन लग्न केलं. मुंबईला गेल्या नंतर फक्त 500 रुपयांसाठी गंगुच्या पतीने तीला मुंबईतील रेड लाईट भागात विकलं. तीथून तीची सुटका न होण्याचा इशारा तीला मिळाल्यानंतर तीने तीथच राहण्यास सुरुवात केली. मात्र त्यादरम्यान एका करीम लाला नावाच्या कुख्यात गुंडाच्या गँग मधल्या एका गुंडाने तीच्यावर आत्याचार केला. त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी तीने करीम लाला यांना भेट देऊन त्या गुंडाला राखी बांधून आपला भाऊ बनवला. यानंतर गंगुबाईची दहशत झााली आणि फिमेल डाॅन म्हणजेच माफिया क्वीन म्हणून तीची ओळख प्रसिद्धीला आली.

दरम्यान, दहशत पसरल्यानंतर कमाठीपुर भागासोबत अनेक ठिकाणी गंगुबाईने कोठे सुरु केले. कोठे चालवणारी ही पहिला महिला होती. मात्र या कोठ्यांमध्ये तीने कोणाला इच्छेविरुद्ध काम करुन नाही दिलं. एवढचं नाही तर गंगुला गंगुमाँ असं देखील म्हटलं जातं. कोठ्यामध्ये प्रत्येक खोलीत या गंगुमाँचा फोटो लावण्यात आला असून यांनी यशस्वीपणे राजकरणात पदार्पण केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लॉकडाऊनची घोषणा

तारीख पे तारीख… एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

…अन्यथा तुझं करिअर खराब करेल, अशी धमकी देत त्यानं बलात्कार केला!

कसला अफलातून कॅच!!! श्रीलंकन खेळाडूचा कायरन पोलार्डने घेतला खतरनाक कॅच, पाहा व्हिडिओ

‘या’ कारणानमुळे तृणमूल काँग्रेसला बसू शकतो मोठा फटका!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More