Top News महाराष्ट्र मुंबई

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

मुंबई | शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवून या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केली होती. यावेळी शरद पवार बोलत होते

महाविकास आघाडीतल्या तीन पक्षातील उत्तम संवाद आणि चांगला समन्वय यातून यात यश मिळण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करण्याचे आदेश शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतंय.

दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी पाच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

पुण्यातील ‘या’ भागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’; नितेश राणेंची जहरी टीका

…मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या