बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पुन्हा येत आहे, चला काहीतरी तूफानी करूयात”

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी “मी पुन्हा येत आहे,” असं सांगितलं आहे.

अमृता फडणवीसांनी “चला काहीतरी तुफानी करूयात, उद्या संध्याकाळी” असं म्हणून पुढे “मी पुन्हा येत आहे,” असं ट्विट केलं आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीस नेमक्या कुठे येत आहेत? किंवा त्याचं नवीन कोणतं गाण येत आहे का?, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र या ट्विटमध्ये काहीही संदर्भ न दिल्याने नेमकं अमृता फडणवीस काय घेऊन येत आहेत? हे काही समजलं नाही.

अमृता फडणवीसांना नेहमी नेटकऱ्यांकडून त्यांच्या गाण्यावरून ट्रोल केलं जात. मात्र या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत त्या नेेहमीच त्यांची नवनवीन गाणी घेऊन येत असतात. यावेळीही त्यांचं एखादं नवीन गाणं येणार की काय?, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यांच्या ट्विटवर तशा प्रतिक्रीया देखील आल्या आहेत. तर काहींनी नेहमीसारखं त्यांना ट्रोल केलं आहे.

अमृता फडणवीसांनी केलेल्या या ट्विटवरही नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केल्याचं दिसून येत आहे. काहींनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे, ती परत आलीये, तर काहींनी म्हटलं आहे की तुमच्या आधी फडणवीस येणार होते. त्यांना तर येऊ द्या, अशा भन्नाट प्रतिक्रीया या ट्विटवर आल्या आहेत. मात्र, ते काहीही असलं तरी अमृता फडणवीस यावेळी नेमकं काय करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”

“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More