Top News महाराष्ट्र मुंबई

राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील

मुंबई | राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण सर्वांनी ऊसतोड कामगारांसाठी काम करुया यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत, असं भाजप खासदार सुजय विखे पाटलांन म्हटलं आहे.

आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम होईल. कुणीही नेतृत्व करा पण पक्षाच्या पलीकडे जावून चांगल्या विचारांनी काम करुया, असंही विखे पाटील म्हणाले. झी मराठी वाहिनीवरली प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या सोमवार प्रदर्शित झालेल्या भागामध्ये तिघेही आले होते.

कार्यक्रमामध्ये अभिनेता सागर कारंडेने पोस्टमन बनून ऊस तोड कामगारांचं जीवन त्यानंतर त्यांच्या मुलांना शिक्षणापासून कशाप्रकारे वंचित रहावं लागतं हे सर्व पत्राच्या माध्यामातून राज्यतील तरूण नेतृत्वाला ऐकवलं. त्यानंतर त्यांनीही आपल्या प्रतिक्रया दिल्या.

दरम्यान, नव्या पिढीला नोकरी कशी देता येईल? यासाठीदेखीस आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असं रोहित पवार म्हणाले. तर ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीला ऊस तोडावा लागू नये हे मला जिवंतीपणी बघायचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या –

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवलं

“गुडघ्यात मेंदू असलेलं सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या