Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय. आपला पंतप्रधान व्हायला हवा, असा निर्धार शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवला आहे. विक्रोळीत एका उद्यानाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यावेळी संजय राऊत बोलतं होते.

संजय राऊत म्हणाले की, “मगाशी पगड्या घालण्यात आल्या, पण पुणेरी पगडी वेगळी असते. पेशव्यांची पगडी वेगळी आहे. ही पगडी म्हणजे संकेत आहे. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत आपले साम्राज्य नेलं होतं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं. आपला पंतप्रधान व्हायला हवा.”

‘बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला घडवलेलं आहे, हा साचा वेगळाच असून, तो कुठेही मिळणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच 105 आमदार घरी बसवले, आता त्यांचे 105 ठीक आहेत, पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील’, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

पुढील लढाई मुंबई महापालिका निवडणुकीची आहे. महापालिकेत शिवसेनेचा भगवा उतरवू असं ज्यांनी आव्हान दिलं आहे. त्यांच्या छाताडावर उभे राहून भगवा फडकवून दाखवू, असंही राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत

CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय

चारचाकी चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकार लवकरच हा निर्णय लागू करणार!

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी

सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या