बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला; पत्नी आणि दोन मुलांना संपवून लिहिली धक्कादायक सुसाईड नोट

नवी दिल्ली | दिल्लीच्या रोहिणी परिसरात मनाला हदरवून टाकणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील सगळ्यांचेच मृतदेह एकाच वेळी सापडले असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेमध्ये कुटुंबातील मुख्य व्यक्ती त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबप्रमुख धीरज हा 31 वर्षांचा असून त्याची पत्नी आरती ही 28 वर्षांची होती. या दोघांची दोन मुलं हितेन 5 वर्षांचा तर अथर्व हा केवळ 3 वर्षांचा होता.

ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वांना मोठा धक्का बसला. दरवाजा उघडताच कुटुंबातील सर्वांचे मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडले होते. मात्र परिवारातील धीरज यादव हा फासावर लटकलेल्या अवस्थेत होता.

तपासणी केल्यानंतर तिथे एक चाकू आणि सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये धीरज त्याच्या आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला असल्याचं लिहिलं आहे. धीरजचा लहान मुलगा बोलू शकत नव्हता तर मोठा मुलगा देखील दिव्यांग असल्याचं समोर आलं आहे. तसेच धीरजच्या वडिलांनी लष्कारातून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या नातवंडांवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र धीरजच्या लहान मुलांची आयुष्यभर काळजी घ्यावी लागणार होती.

दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलिसांना ही घटना समजली. त्यानंतर आता पोलीस सगळ्या बाजूने तपास करत आहेत. यादरम्यान धीरज हा कंत्राटी ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक, लॅाकडाऊनबद्दल होऊ शकतो ‘हा’ मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भयाण वास्तव, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला माणसं मिळेना!

बॉलिवूडला मोठा धक्का; ‘या’ एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शकाचं निधन!

एप्रिल-मे मध्ये होईल कोरोना कहर; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे धक्कादायक निष्कर्ष!

“महाराष्ट्राच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये मात्र थाळ्या पिटल्या”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More