बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”

कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे दोन नेते ऊसाला एकरकमी भाव देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. आता यावरून राजू शेट्टींनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर अतिशय खोचक शब्दात टीका केली आहे.

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच आहेत, अशी बोचरी टीका राजू शेट्टींनी केली आहे. यावेळी बोलताना साखर कारखान्यांनी ऊसाच्या पोत्यावर काढलेलं कर्ज दिसतं, मग ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज का दिसत नाही?, तसेच एरवी एकमेकांविरोधात बोलणारे, एफआरपीचे तुकडे करण्यावर एकमत कसे?, असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.

केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा घाट केला आहे आणि राज्य सरकारने त्याला संमती देखील दिली आहे. एरव्ही एकमेकांना बघून घेण्याची भाषा करणारे राज्य आणि केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करताना मात्र एकत्र येतात, असा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना ऊसाची सगळी रक्कम एकाच टप्प्यात मिळावी, अशी राजू शेट्टींची भूमिका आहे. मात्र शरद पवारांनी ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी अशी भूमिका मांडत त्यामागील फायदे आणि तोटे देखील सांगितले आहेत. यावरुनच शेट्टी आणि पवारांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”

“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू

‘…तर शहरात पाय ठेवणार नाही’; अमोल कोल्हेंनी भाजपला दिलं चॅलेंज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More