बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलच! पोपटाची विद्यार्थ्यासोबत मैत्री, सोशल मीडियावर अनोख्या मैत्रीची तुफान चर्चा

नवी दिल्ली | पोपट हा बहुतेक जणांच्या आवडीचा पक्षी आहे. लोकांना पोपटाची आवड असल्यामुळे घरात पिंजऱ्यात ठेवतात. त्याला प्रशिक्षण दिलं जातं परंतु, मध्यप्रदेशामध्ये पिंजऱ्यात नसलेला एक पोपट शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगाखांद्यावर खेळत असल्याचं दिसत आहे.

या पोपटाची मुलांशी चांगलीच गट्टी जमली आहे. शाळेत जात असतांना हा पोपट विद्यार्थांच्या जवळ जातो. त्यांच्या डोक्यावर देखील बसतो. मध्यप्रदेश येथील बालग्राम जंगल परिसरात हा पोपट दररोज मुलांजवळ येतो. मुलांशी खुप चांगल्या पध्दतीने खेळतो. या मुलांनी पोपटाचं नाव मिठ्ठू असं ठेवलं आहे. हा पोपट मुलांना न घाबरता त्यांच्याजवळ जातो. त्यांच्यासोबत शाळेपर्यंत देखील जातो.

याबाबत मुलांना विचारले तेव्हा, आम्ही ज्यावेळेस शाळेत जातो तेव्हा हा पोपट आमच्या खांद्यावर येऊन बसतो. तो आम्हाला घाबरत देखील नाही. आम्ही त्याच्याशी खुप मस्ती करतो, असं मुलांनी सांगितल आहे.

दरम्यान, या मुलांच्या आणि पोपटाच्या मैत्रीचं समाज माध्यमांवर कौतुक केलं जात आहे. पोपटाचे तसेच मुलांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हे सर्व फोटोंबाबत एनआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पहा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला ‘त्या’ निर्णयावरून घरचा आहेर; म्हणाले…

श्रेयस अय्यर दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’! अखेरपर्यंत एकटयाने खिंड लढवत मुंबईवर केली मात

“‘त्यांच्यामुळे’ मी राजकारणात स्थिर झालो, माझा आणि राजकारणाचा दूरदूरचा संबंध नव्हता”

गांधी जयंतीदिवशी सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून नथूराम गोडसे जिंदाबादचा नारा!

“मंत्री या नात्याने माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं तुमचं कर्तव्य आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More