उत्तर कोरियात दोन वर्षांनी कोरोना रूग्ण आढळताच किम जोंगने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील देश कोरोना (Corona Virus) महामारीशी झुंज देत आहेत. iगेल्या काही दिवसांपासून अनेक देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहे.
चीनसह अनेक युरोपीयन देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असताना उत्तर कोरियात (North Korea) दोन वर्षांनी कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. उत्तर कोरियात दोन वर्षात पहिल्यांदाच कोरोना रूग्ण आढळल्याची अधिकृत माहिती देशाने जाहीर केली आहे.
KCNA वृत्त समूहाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाच्या राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक नागरिकांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron) लागण झाली आहे. तर ‘डेली मिरर’च्या माहितीनुसार उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली आहे.
दरम्यान, उत्तर कोरियात नागरिकांना घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर किम जोंगने सत्ताधारी कोरियाई वर्कर्स पार्टीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत किम जोंगने कोरोना संक्रमण लवकरात लवकर नष्ट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा
“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी मनसेची तुफान टोलेबाजी, ‘टोमणे सभा’ म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचलं
गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास
काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल
Comments are closed.