बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

परभणी | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेेंदिवस कोरोना रूग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत चाललेल्या फैलावामुळे राज्यातील काही जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच नागपूरनंतर आता परभणी जिल्ह्यात दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

दोन दिवस परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन असणार असून यामध्ये 13 आणि 14 मार्चला लॉकडाऊन राहणार आहे. या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन चालू होणार असून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती समजत आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन होणारा परभणी हा दुसरा जिल्हा आहे. याआधी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी नागपूरमध्ये लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालयं बंद आहेत तर शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थितीला परवानगी आहे. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा आणि मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहणार असल्याचं नगपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, कोरोना पुन्हा आपलं डोक वर काढत आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून आपण कोरोनाचे सर्व पाळले पाहिजेत. अन्यथा नाईलाजाने आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोर जावं लागेल.

 थोडक्यात बातम्या-

बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More