बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना

पुणे | कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून लॉकडाऊन असल्याने धार्मिक कार्यक्रम तसंच लग्न समारंभावर बंदी आणण्यात आली होती. मात्र आता पुण्यात  विवाह करणाऱ्या इच्छुकांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही सगळ्यात महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये परवानगीची गरज नाही. कंटेनमेंट झोन वगळता कुठेही लग्न करता येऊ शकते. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरासह इतर कटेंनमेंट झोन वगळून जिल्हाअंतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही. सुरक्षित समाजिक अंतर ठेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.

कंटेनमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसंच कंटेनमेंट झोनमधून ये-जा देखील करता येणार नाही, अशा सूचना सरकारच्या 3 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या आदेशामधील असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 1 हजार 576 नवे रूग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

“पॅकेज म्हणजे काय सिरीयल आहे का? पंतप्रधानांनी मोमो दाखवून अर्थमंत्र्यांनी रोज एपिसोड सादर करावा”

महत्वाच्या बातम्या-

“खडसे, पंकजा, बावनकुळे तावडे यांच्या भूकंपातून नवी वाट पेटू नये म्हणून भाजपने सावध राहावं”

कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे; एकनाथ शिंदे संतापले

“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More