बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोणावळ्याच्या तन्वी बंगल्यात पोलीस पोहोचले अन् समोर जे दिसलं ते पाहून हादरले

पुणे | लोणावळ्यातील एका खासगी बंगल्यात विनापरवाना अश्लील डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लोणावळ्याच्या कार्ला गावातील MTDC रिसॉर्ट शेजारी असलेल्या तन्वी बंगल्यावर कारवाई केली आणि 9 पुरूष व 8 महिलांना ताब्यात घेतलं.

कार्ला गावाच्या दुर्गा सोसायटीमधील या तन्वी बंगल्यात 9 पुरूष आणि 8 महिला स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे लावून अश्लिल हावभाव करत नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तन्वी या खासगी बंगल्यात पोलिसांनी छापा टाकल्यावर विनापरवाना हे गैरकृत्य सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बंगल्यावर छापा टाकण्यात आला व 9 पुरूष आणि 8 महिला अशा 17 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे. पोलीसांनी या बंगल्यावरून तब्बल 74 लाख 27 हजार 630 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला आणि अटकेच्या कारवाईसह या बंगल्यावरून रोख रक्कम, 5 चारचाकी वाहने, मोबाईल फोन आणि स्पीकर असं सामान जप्त केलं आहे. अटकेची कारवाई करण्यात आलेले 9 पुरूष भोसरी परीसर व चान्होली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भाजपचा मोठा निर्णय?, चित्रा वाघ यांच्यासाठी आनंदाची बातमी

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील आजची कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More