लाँग मार्चमधील शेतकऱ्यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण

मुंबई | नाशिक ते मुंबई लाँग मार्चमधील शेतकऱ्यांना सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विक्रोळीत यासंदर्भात मोर्चेकऱ्यांशी बोलणी केली. 

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन हा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निश्चय मोर्चातील शेतकऱ्यांचा आहे. 

दरम्यान, गिरीश महाजन यांनी शेतकरी नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. रात्री मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असून कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरही या बैठकीला उपस्थित असतील असं कळतंय.