बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

नवी दिल्ली |  कोरोनाकाळात नागरिकांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. तोच दुसरीकडे महागाईनं तर उच्चांक गाठला आहे. अशातच आता सण-उत्सव जवळ आले असताना सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसणार असल्याचं दिसतंय. पेट्रोल-डिझेल दरवाढ, LPG Gas दरवाढीनं सर्वसामान्य हैराण झाले आहेत. मात्र ही परिस्थिती केवळ भारताचीच नाही तर इतरही देशात हीच परिस्थिती असल्याचं समोर आलंय.

श्रीलंकेतही महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून येथे घरगूती सिलेंडरची किंमत भारताच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. तर श्रीलंकेच्या पूर्वीच्या किंमतीपेक्षा दुप्पट झाली आहे. सध्या श्रीलंकेत गॅस सिलिंडरची किंमत 2657 रुपये झाली आहे. श्रीलंकेत सरकारने नुकतीच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवरील मर्यादा संपवली होती. त्यानंतर एलपीजीच्या किंमतीत सुमारे 90 टक्क्याने वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

एलपीजी सोबतच श्रीलंकेत दुधाची किंमतही वाढली आहे. श्रीलंकेत एक लिटर दुध तब्बल 250 रूपयांना मिळत आहे. यासोबत इतरही अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. या देशात 12.5 किलो सिलिंडरची किंमत 1400 रुपये होती. पण त्या किमतीत 1257 रूपयाची वाढ झाली असून आता येथे सिलिंडर 2657 रूपयांना विकला जात आहे. भारतात सध्या 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांच्या आसपास आहे.

या महागाईविरोधात श्रीलंकेतील सामान्य नागरिक हैरान झाले असून त्यांनी सोशल मीडियावरून याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजापक्षा यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत श्रीलंका सरकारने एलपीजी गॅस, दुध, साखर, गव्हाचे पीठ, सिमेंटचे किंमत मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेतील जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More