Top News मनोरंजन

कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर आता प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी कंगणाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलाय.

एका वृत्तवाहिनीला कंगणाने मुलाखत दिली होती. त्यावेळी केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांनी तिच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलाय.

जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावून हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबांची माफी मागण्याची धमकी दिली असल्याचं कंगणाने मुलाखतीत म्हटलं होतं. शिवाय तिने सुशांत सिंग राजपूत प्रकरणात माझं नाव विनाकारण घेतलं असंही जावेद अख्तर यांनी म्हटलंय.

जावेद अख्तर यांनीही कंगणाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या