माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

सोलापूर |  संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

शरद पवारांनी माढ्याच्या आखाड्यातून माघार घेतल्यानंतर माढ्यात राष्ट्रवादीकडून कोण दंड थोपटतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटलांनी अजून राष्ट्रवादीची साथ सोडलेली नाही.

दरम्यान, भाजपने आणखी माढा लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!

प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!

शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळालीय संधी….