बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू लागू

भोपाळ | कोरोनाच्या (Corona) ओमिक्राॅन (Omicron) या व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच देशात दाखल झालेल्या ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (Central Government) राज्यांना गंभीर इशारा दिला आहे. अशातच आता मध्य प्रदेश सरकारनं (Madhya Pradesh Government) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेश सरकारनं वाढत्या ओमिक्राॅनच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chowhan) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये रात्री 11 ते 5 मध्ये कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नवीन वर्ष सुरू होण्यास अवघा आठवडा उरला असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. विविध ठिकाणी रात्री पार्टी करण्याचा प्रकार होत असतो. परिणामी आता सरकारनं गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्राॅनचा धोका वाढू नये म्हणून हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या निर्णयानं सर्वत्र आतातरी ओमिक्राॅनला गांभिर्यांनं घेतलं जाणार, अशी चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात लाॅकडाऊनबाबत गंभीर वक्तव्य केलं आहे. परिणामी चौहान सरकारनं हा कर्फ्यूचा निर्णय घेतला आता महाराष्ट्र सरकार पण निर्बंध लावण्याचा विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

‘…अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ’; एकनाथ शिंदे यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

“खाली बसा… मी मंत्र्याशी बोलतोय तुम्ही काय मंत्री आहे का?”

मोठी बातमी! न्यायालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दणका, आता…

‘भारतात दररोज Omicron चे 1.8 लाख रूग्ण आढळतील’; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

‘मी टेनिस खेळायला गुलजार यांना स्कर्ट मागितलेला’; नीना गुप्तांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More