बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

मुंबई | अनुसूचित जातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला लागू होणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती. त्या घोषणेचं सरकारने निर्णयात रुपांतर केलं आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात. त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत. सरकारने थेट आरक्षण न देता अनुसुचित जातींमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, 2014 साली देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र कार्यकाल संपत आला तरीही धनगर समाजाला अनुसूचित जातींमधील आरक्षण दिलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

वेल्हाचं नाव ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

‘अब होगा न्याय!’ ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More