Top News राजकारण

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री

मुंबई | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचं बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झालंय. यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची फार मोठी भूमिका होती.”

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावलाय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहिलीये.

दरम्यान, अहमद पटेल यांना 1 महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात

फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”

काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या