Top News आरोग्य कोरोना धुळे

भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

धुळे | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. त्यातच आता महाराष्ट्रात भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. चाळीगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. याशिवाय पाचोरामधील किशोर पाटील यांनाही कोरोना झाल्याचं समजलंय.

आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबूकद्वारे ही माहिती दिली आहे. ते लिहितात, “मला कोरोनाची प्रार्थमिक लक्षणं दिसत होती. लक्षणं दिसून आल्यानंतर मी चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला. सध्या माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सेल्फ क्वारंटाईन आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करू घ्यावी.”

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून…

Posted by Mangesh Chavan – मंगेश चव्हाण on Friday, August 21, 2020

माझी काळजी करण्याचं कारण नाही. तुमचे आशिर्वाद तसंच शुभेच्छा माझ्या सोबत आहेत. सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे. 23 ऑगस्ट रोजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.

राज्यात शुक्रवारी ११,७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर एकूण ४,७०,८७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate७१.६२ % एवढं झालंय.

महत्वाच्या बातम्या-

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडे सोशल मीडियावर ट्रोल!ॉ

2014-2019 दरम्यान भाजप शिवसेनेबरोबर युती करुन सत्तेत नसती तर….- देवेंद्र फडणवीस

दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक

“गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल”

भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या