Top News कोरोना राजकारण

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर जाहीररित्या फटकारलं. यानंतर पवार कुटुंबात कलह सुरू झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणावर विरोधकांसह अनेकांनी भाष्य केलंय. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार, अजित पवार तसंच पार्थ बसून या विषयावर नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. राजेश टोपे म्हणाले, “पवार कुटुंबामध्ये एकोपा आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती आहेत. शरद पवार कुटुंबातील आदर्श असून अनेकदा ते अशा पद्धतीने सदस्यांशी बोलत असतात. त्यामुळे हा विषय ते घरात बसून एका मिनिटात हा विषय मिटवतील.”

राजेश टोपे पुढे म्हणाले, “माझ्या दोन पिढ्यांचा संबंध पवार कुटुंबियांशी आहे. अजित दादांना मी चांगला ओळखतो, त्याचप्रमाणे पार्थही माझा चांगला मित्र आहे. त्यामुळे त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते सुटतील. कोणीही या सर्व गोष्टींना वेगळं वळण देऊ नये.”

सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. मात्र अशा परिस्थितीतही अनेक खाजगी रूग्णालयं सेवा देत नसल्याचं लक्षात आलंय. अशा खाजगी रूग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, जर कोणतंही खाजगी रूग्णालय रूग्णसेवा देण्यासाठी हलगर्जीपणा करत असेल तर त्याविरोधात बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या