बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबत”

पुणे |  काही दिवसांमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. या भेटीवर महादेव जानकर यांनी आपली प्रतिक्रिया देत चर्चांणा पुर्णविरामदिला आहे.

माझे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण आहे पण याचा फायदा मी दुसऱ्याला घेऊ देणार नाही. मी भाजपसोबतच असणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये ते बोलत होते.

भाजपवर नाराज असलो तरी आपण एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही निशाणा साधला.

दरम्यान, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरू आहेत. माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे तेवढा तो नाही, असं म्हणत जानकरांनी पडळकरांना टोल लगावला.

थोडक्यात बातम्या-

Shree

दुचाकीवरुन प्रवास करणारांसाठी आता नवे नियम; पाळले नाहीतर कारवाई होणार!

“मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती आहे”

2020 मध्ये ‘कोरोना’ नव्हे तर ‘हा’ शब्द ॲानलाईन डिक्शनरीत सर्वाधिक शोधला गेला!

अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या…

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More