बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूर ओसरताच पुन्हा चालू होणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!

अहमदनगर | माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन आणि त्यानंतर राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा थांबवण्यात आली होती. मात्र आता येत्या 17 ऑगस्टपासून या यात्रेचा दुसरा टप्प्याला सुरूवात होत आहे.

महाजनादेश यात्रेच्या या दुसरा टप्प्याची सुरूवात अहमदनगरमधून होणार आहे. 18 जिल्ह्यातल्या 93 विधानसभा मतदारसंघातून जात ही यात्रा 2745 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

सांगली-कोल्हापूरची पूरस्थिती आता नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधं, अन्न-धान्याचा पुरवठा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढं येत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून थांबवण्यात आलेल्या यात्रांचा पुढच्या टप्प्यांच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

-रामदास आठवलेंची सांगली-कोल्हापूरच्या पुरग्रस्तांना 50 लाखांची मदत

-कोथरुडमधून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट???, ‘या’ नेत्याला तिकीट मिळण्याची शक्यता!

-…तर मी शिवसेनेची हमी मी घेतो- रावसाहेब दानवे

-या भाजप आमदाराने घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

-“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का???”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More