औरंगाबाद महाराष्ट्र

या कारणामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या त्या 9 महिलांची सर्वात आधी सुटका!

मुंबई | मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ कल्याण जवळच्या वांगणी इथे काल रात्रीपासून रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्याने अडकली आहे. या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 3 रबरी बोटींच्या साहाय्याने लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

महालक्ष्मी एक्स्पेसमध्ये 9 महिला गर्भवती अडकल्या होत्या, त्यापैकी 9 महिन्याच्या गर्भवती असणाऱ्या रेश्मा कांबळे या महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या होत्या. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. आता NDRF च्या टीमने या सर्व गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

600 प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यात NDRF च्या टीमला यश आलं आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान, काल रात्रीपासून महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीमध्ये अडकून आहे. 12 तास उलटून गेल्यानंतर इथे प्रशासनाकडून मदतकार्याला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

-‘या’ महत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या