बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात वीजेची टंचाई होणार नाही?, ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

नाशिक | सर्वत्र वीज टंचाईची भीती डोकावत असतानाच महाराष्ट्रात मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी कोळशाचा साठा कमी पडत असल्याने वीजटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. यातच महाराष्ट्रात मात्र परिस्थिती उलट असून राज्यातील महानिर्मिती कंपनीने वीजनिर्मीती पूर्वीपेक्षा वाढवल्याचं समोर आलं आहे. राज्यातील महानिर्मिती कंपनीकडे सध्या 2 दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

महानिर्मिती कंपनीच्या विद्युत केंद्राची एकूण क्षमता 12 हजार 972 मेगावॉट आहे. मात्र 10 ऑक्टोबरपासून कोळश्याच्या साठ्यामध्ये वाढ झाल्याने महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांतून होणारी वीजनिर्मीती 5 हजार 200 मेगावॉटपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या कंपनीकडे जरी 2 दिवसांपुरताच कोळसा शिल्लक असला तरी कोळसा पुरवठ्यात वाढ झाली असून दर दिवसाला 90 हजार टन ते एक लाख मेट्रीक टन इतक्या कोळश्याची आवक सुरू आहे.

दरवर्षी महानिर्मितीकडून ऑगस्ट महिन्यात 3 हजार मिलीयन युनिट्स वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यात वीजेची मागणी अचानक वाढल्याने 4 हजार मिलीयन युनिट्स वीजपुरवठा करण्यात आला होता. अचानक वीजपुरवठा वाढवल्याने कंपनीकडे असणारा कोळशाचा साठा कमी पडू लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही विजेची टंचाई निर्माण होणार अशी भीती होती, परंतु, कोळशाचा साठा पुन्हा वाढल्याने ती भीती संपली आहे.

सध्याच्या परिस्थितीत महानिर्मीती कंपनीकडे कोळश्याची आवक वाढल्याने 1.91 लक्ष टन कोळशाचा साठा शिल्लक आहे. यामुळे महानिर्मितीने वीजनिर्मिती वाढवली आहे. ऑगस्ट महिन्यात विजपुरवठा वाढवावा लागल्याने कोळशाचा साठा कमी पडला होता. त्यामुळे महाराष्ट्रालाही कदाचित वीजटंचाईच्या संकटाला सामोरे जावं लागेल, असं वाटलं होतं. परंतु महानिर्मितीच्या योग्य नियोजनाने राज्याला वीजसंकटापासून वाचवलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींचा नवीन मास्टर प्लॅन; उद्या लाँच करणार ‘ही’ जबरदस्त योजना

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More